|
| Index | Recent Threads | Unanswered Threads | List Polls | Public Albums | Who's Online | Help |
|
|
| No member browsing this thread |
|
Thread Status: Active Total posts in this thread: 2 |
|
| Author |
|
|
Stranger ![]() Joined: Mar 21, 2004 Post Count: 12 Status: Offline |
आमच्या बैलाला लाळ खुरकुद रोग झाला आहे. जिभेवर फोड आले आहेत. त्यामूळे तो काहीही खात नाही. कृपया लवकरात लवकर उपाय सांगा. तसेच काही न खाल्ल्याने बैल अशक्तही झाला आहे , त्याला शक्ती येण्यासाठी कोणते औषध द्यावे. व काय खायला घालावे . श्री. बाळासाहेब जाधव, पाबळ. आपण पाठवलेल्या लक्षणांवरून तसेच फोटोवरून आपल्या बैलाला लाळ खुरकत हा विषाणूजन्य आजार झाल्याचे दिसत आहे. लाळ आणि खुरकत हा विषाणूजन्य आजार आहे. हा रोग गाई म्हशी, शेळ्या व मेंढ्यामध्ये आढळतो. या रोगांमध्ये संकरीत वासरांमध्ये 15 ते 60 टक्के मृत्यूचे प्रमाण आढळते. दुभती जनावरे दुधाला कमी येतात अथवा दुधातून जातात. तीव्र आजारात जनावराचा मृत्यू ओढवतो. आजाराची लक्षणे. 1. जनावराला सपाटून ताप येतो. 2. जनावर खात व पीत नाही. 3. जनावर काळवंडते, मलूल पडते. 4. जनावरांच्या तोंडात, जिभेवर, हिरड्यावर फोड दिसतात. 5. तोंडातून एकसारखी लाळ आणि फेस येतो. 6. तोंडाच्या फोडाचा पापूंद्रा जाऊन लालभडक गरे(जखमा) पडतात. 7. जनावरांच्या पायाच्या बेचक्यात फोड येऊन फूटतात. 8. जनावर लंगडते. 9. जनावर धापा टाकते. दक्षता व उपाय. 1. ज्या जनावराला या रोगाची लागण झाली आहे त्या जनावराला वेगळे बांधावे. 2. त्याचा उष्टा चारा, पाणी इतर जनावरांना देऊ नये. 3. लाळ खुरकत रोगाची लस नियमीतपणे टोचून घ्यावी. 4. लागण झालेल्या जनावरांचे तोंड पोटॅशियमच्या पाण्याने स्वच्छ धुवावे. जिभेला व तोंडातील जखमांना ग्लिसरीन लावावे. 5. हीमेक्स(Himex) मलम लावावे. 6. गोड्या तेलात कोथींबीर बुडऊन जनावरांना चारावी. 7. जनावरांना राकट स्वरूपाची वैरण खाऊ घालू नये. त्यामुळे जनावरांच्या तोंडात जखमा होण्याची शक्यता असते. 8. मऊ व पालेदार वैरण खाऊ घालाव्यात. 9. आजारी जनावराला धुळीमधून फिरवु नये, कोणत्याही प्रकारचा आसुरी उपचार करू नये. 10. तज्ञ पशुवैद्यकाच्या सल्यानुसार उपचार करावेत. 11. गोठ्यात चून्याचे पाणि फवारावे. 12 जनावराला ताकद येण्यासाठी गहू किंवा बाजरीच्या पिठाची पेज करून पाजावी. संतोष शिंदे. ---------------------------------------- Thanks & Regards, Satish Kagathara. Research Assistant, Media Lab Asia, KReSIT, IIT Bombay. E-mail:satishk@iitb.ac.in Tel: +912225764989(O). Cell: +919819409630. |
||
|
|
Stranger Joined: Jun 3, 2007 Post Count: 1 Status: Offline |
WHAT HAPPEND TO U? |
||
|
|
|
|
|
Current timezone is GMT Jan 7, 2009 5:54:10 PM |

